सिल्लोडला भाजप कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी), भराडी चौक सिल्लोड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा, न्यायप्रिय प्रशासनाचा आणि समाजहितासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरवपूर्वक स्मरण करण्यात आले. त्यांच्या आदर्श विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजसेवा व जनकल्याणासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी भाजप प्रदेश चिटणीस सुरेश बनकर, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे, मंडळ अध्यक्ष मनोज मोरेल्ल, जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण काकडे, भवन मंडळ तालुकाध्यक्ष एकनाथ हिवाळे, नगरसेवक स्वप्निल शिनगारे, सुदाम बन्सोड, अनिल खरात, पंजाबराव कोलते, विनोद टिकारे, विजय वानखेडे, अतुल साळवे, अमोल कुलकर्णी, योगेश साळवे, अरुण राठोड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.